Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

Ajit Pawar : अजित पवार यांनी आज 25 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेली दुसरी यादी आणि त्यासोबत झालेल्या प्रमुख पक्षप्रवेशांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकाच तासात चार प्रमुख नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्याचबरोबर त्यांना तात्काळ विधानसभा उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली. या खेळीमुळे अजित पवार यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे इशारा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आज अजित पवारांच्या गटात भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काका पाटील, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी, सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच त्यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीत मोठ्या नेत्यांविरोधात टोकाची लढत रंगणार आहे.

  1. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा : माजी खासदार संजय काका पाटील यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. येथे त्यांची थेट लढत राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांच्याशी होणार आहे, ज्यामुळे हा मतदारसंघ विशेष चर्चेत राहणार आहे.
  2. वांद्रे पूर्व विधानसभा :विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि लगेचच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली. आता त्यांच्या विरोधात शिवसेनेचे वरुण सरदेसाई असणार आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात हा सामना चुरशीचा ठरणार आहे.
  3. इस्लामपूर विधानसभा : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी देखील अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून, जयंत पाटील यांच्या विरोधात ही लढत होणार आहे.
  4. लोहा-कंधार विधानसभा :माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून लगेचच उमेदवारी मिळवली. त्यांची लोहा-कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवली जाणार आहे.
  5. अणुशक्तीनगर विधानसभा :नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनाही अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली असून त्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

एकाच तासात चार प्रमुख नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्याचबरोबर त्यांना तात्काळ विधानसभा उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली. यातून अजितदादांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशाराच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Ajit Pawar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय