नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. मॉल व किराणा दुकानात दारू विक्री करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा जमसं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अस इशारा जिल्हा कमिटिच्या वतीने देण्यात आला आहे.
मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा – जनवादी महिला संघटना आक्रमक
अर्थव्यवस्था सुधारण्याच्या भंपक बहाण्याने मॉल व सुपर मार्केट तसेच किराणा दुकानात दारू विक्री करण्याचा जनविरोधी निर्णय राज्य सरकारने घेतला असून तो अत्यंत घातक व अनेक महिलांचे संसार उध्वस्त करणारा आहे. तो निर्णय तात्काळ रद्द करावा ही मागणी जनवादी महिला संघटनेच्या नांदेड जिल्हा कमिटीने केली आहे.
बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी
निवेदनावर जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड, शहर निमंत्रक कॉ.लता गायकवाड, सीटूच्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, कॉ.मीना आरसे, शीलाताई ठाकूर, विजयमाला कलवले, ज्योती दवणे, शोभा हटकर, लता सुर्यवंशी, उषा आढाव, दिक्षा बहादूरे, सी.एन.पांचाळ, रब्बाना बी, जे.बी.डावरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
शेतकरी – कामगार बेरोजगारांची निराशा करणारे बजेट – कामगार नेते डॉ. डी. एल. कराड
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा