Ahmednagar : अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. समर शेख नावाच्या 4 वर्षीय मुलाचा अंगणात खेळता खेळता हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
समर शेख आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना मॅनहोलच्या (हौद) झाकणावर उभा होता. मात्र, झाकण कमजोर असल्यामुळे समर त्यात पडला. मॅनहोलमध्ये पाण्याचा मोठा साठा असल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. समर बराच वेळ कुठे दिसत नसल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. पाच तासांच्या अथक शोधानंतर, एका व्यक्तीने हौदात डोकावून पाहिले असता, समरचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
Ahmednagar
या दुर्देवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबियांच्या दुःखात साऱ्या शेजाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर लोकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश
सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल