Saturday, March 15, 2025

किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया माहूर तालुका कमिटीच्या वतीने आंबेडकर चौकात आंदोलन

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

माहूर : अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया माहूर तालुका कमिटीच्या वतीने आंबेडकर चौकात विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा, शिषवृत्ती खात्यावर जमा करा, यांसह इतर मागण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी रेणुका कॉलेज माहूर व तहसील कार्यालय मार्फत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करून, सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे व ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ प्रवेश शुल्क फक्त ५० रुपयेच्या तत्वावर प्रवेश द्या, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांची पोर म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधातील तिन काळे कायदे परत घ्या, शेतमालाला हमी भाव द्या, या मागण्यांना घेऊन आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. 

यावेळी माकपचे जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम, किसान सभेचे किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण, कैलास भरणे, एसएफआय नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर, तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे, सुरज कांबळे, चंद्रकांत पाटील, अभि खंदारे, तुषार कांबळे, महेश कांबळे, कश्यप कांबळे, स्टॅलिन सिडाम, आदेश लांडगे, अजय पाझारे समाधान माजळकर, मृणाल येउतकर, प्रतीक मुनेश्वर तसेच माहूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles