Tuesday, April 23, 2024
Homeराज्यआशा व गटप्रवर्तक संप मागे घेणार ? शरद पवारांची मध्यस्थी !

आशा व गटप्रवर्तक संप मागे घेणार ? शरद पवारांची मध्यस्थी !

पुणे : आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप मिटण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचे अध्यक्ष एम.ए.पाटील यांची खा. शरद पवार यांनी आज भेट घेतली.

माफक किमान वेतन आणि कोरोना काळातील कामाचा योग्य भत्ता मिळावा या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला होता.

 

 खा. पवार यांनी एम. ए. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे म्हणणे जाणून घेतले  यासंदर्भात महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून वेतनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यास त्यांना सुचविले, असल्याचेही पवार म्हणाले. 


या चर्चेनंतर पाटील यांनी संप मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, असल्याचे पवार यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच संप मिटवण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचा आभारी आहे, असल्याचे खा. पवार यांनी म्हटले आहे.

  

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय