Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानानंतर नारायण राणेंकडून मुलाची कान उघडणी

Narayan Rane : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार आणि राज्याचे मत्स्य पालनमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धाराशिव येथील एका कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

---Advertisement---

नितेश राणे यांनी, “सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे सर्वांनी लक्षात ठेवा,” असा धमकी वजा इशारा शिंदे गटाच्या शिवसेना नेत्यांना दिला होता. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून, त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितेश यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा : अभिनेता डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी, वाचा काय आहे प्रकरण !)

नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य | Nitesh Rane

धाराशिव येथील भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. “कुणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, “काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय.” हे वक्तव्य धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. या समितीच्या कामांना भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली होती, ज्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाला.  (हेही वाचा : धक्कादायक : 73 वर्षीय आजीला लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखांची फसवणूक)

---Advertisement---

नितेश यांच्या विधानावर नारायण राणेंची नाराजी | Narayan Rane

नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर त्यांचे वडील नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नारायण राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो. नितेशने केलेले वक्तव्य चुकीचे आहे.” त्यांनी आपल्या मुलाला समज देत अशा प्रकारे बोलणे योग्य नसल्याचे सांगितले. नारायण राणे यांनी पुढे असेही म्हटले की, “कोणाचीही बाप काढणे चुकीचे आहे. मी नितेशशी बोललो असून त्याने आपली चूक मान्य केली आहे.” (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)

निलेश राणेंचा सल्ला

नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मोठे बंधू आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनीही त्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला. निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित म्हटले, “नितेशने जपून बोलावे. सभेत बोलणे सोपे आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण कोणाचा फायदा करतोय याचे भान ठेवले पाहिजे. आपण महायुतीत आहोत, हे विसरता कामा नये.” निलेश यांनी ही पोस्ट नंतर डिलीट केली, परंतु त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले.  (हेही वाचा : ट्रम्प विरोधी लाखो निदर्शकांचे न्यूयॉर्क, वॉशिंग्टनसह देशभरात संतप्त मोर्चे)

नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

नितेश राणे यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास नवा नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भडकाऊ आणि आक्षेपार्ह विधाने केली आहेत. 2024 मध्ये, त्यांनी एका सभेत मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर दोन एफआयआर दाखल झाल्या होत्या. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (एआयएमआयएम) पक्षाने त्यांच्या अटकेची मागणीही केली होती. या प्रकरणातही नारायण राणे यांनी नितेश यांना समज दिली होती. (हेही वाचा : OYO साठी नवीन नाव सुचवा आणि जिंका ₹3 लाख ; रितेश अग्रवाल यांची अनोखी ऑफर)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles