Thursday, July 4, 2024
HomeNewsहिंडेन बर्ग च्या आरोपानंतर अदानी समूहवादाच्या भोवऱ्यात तर गुंतवणूकदार संभ्रमात...

हिंडेन बर्ग च्या आरोपानंतर अदानी समूहवादाच्या भोवऱ्यात तर गुंतवणूकदार संभ्रमात…

– सुमती डोंगरे

– (लेखिका मुक्त पत्रकार असून अर्थशास्त्राच्या अभ्यासिका आहेत.)

अमेरिकेतील हिंडेन बर्ग या भांडवली बाजारात रिसर्च करणाऱ्या संशोधन संस्थेने आदानी उद्योग समूहावर गंभीर असे आर्थिक गैर व्यवहाराचे आरोप केले आहेत. आरोपानंतर आदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली ही घसरण सोमवारी तरी थांबेल का? या चिंतने गुंतवणूकदार त्रस्त झाले आहेत. हे सगळं प्रकरण नेमकं काय याविषयी सामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत याच बाबत सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

हिंडेन बर्ग या संस्थेने अदानी उद्योग समूहावर काय आरोप केले आहेत? आरोप करणाऱ्या संस्थेची विश्वासार्हता? अदानी उद्योग समूहाचं यावर नेमकं प्रत्युत्तर काय? अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समधील घसरण तात्कालीक आहे की दीर्घकालीन? अदानी उद्योग समूहाला कर्ज दिलेल्या बँका अडचणीत येऊ शकतात का? या सर्व प्रश्नाविषयी जाणून घेऊ…

हिंडेन बर्ग संस्थेने गौतम अदानी व अदानी उद्योग समूहावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आणि अकाउंटिंग घोटाळ्याचे आरोप केलेत. मॉरिशस मधून कार्यरत असणाऱ्या ३८ शेल (Shell) कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपये अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवले गेले आहेत. त्यामुळे शेअरच्या भावात कृत्रिम रित्या प्रचंड वाढ झाली, याविषयी हिंडेन बर्ग ने वापरलेला नेमका शब्द आहे ‘Brazen stock manipolution’ मॉरिशस सोबतच शिपरस, यु ए इ, सिंगापूर आणि कॅरिबियन बेटातून मनी लॉन्ड्रींगच्या द्वारे पैसा अदानी उद्योग समूहात गुंतवला गेला. यातल्या अनेक कंपन्या अदानी कुटुंबातील व्यक्ती किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून चालवल्या जात आहे असा गंभीर आरोप हिंडेन बर्गने प्रकाशित केलेल्या अहवालात केला आहे. हा एकूण घोटाळा २१८ बिलियन डॉलरचा आहे. अदानी इंटरप्राईजेस आणि अदानी टोटल गॅस या अदानी समूहाच्या कंपन्यांचे ऑडिट करणारी शहा धंडारिया ही छोटीशी कंपनी आहे, या ऑडिट कंपनीची सध्या साधी वेबसाईट सुद्धा कार्यरत नाही, फक्त चार भागीदार आणि अकरा कर्मचारी या कंपनीत काम करतात.

अदानी इंटरप्राईजेस आणि अदानी टोटल गॅसच्या ऑडिट रिपोर्टवर ज्या पार्टनर्सनी सही केलीये ते ऑडिटर्स काम सुरू झाले तेव्हा अवघे तेवीस – चोवीस वर्षांचे होते. हिंडेन बर्ग रिसर्च संस्थेने गौतम अदामी यांना ८८ प्रश्न विचारले आहेत, संस्थेच्या म्हणण्यानुसार अदानी उद्योग समूहा एवढा मोठा आर्थिक घोटाळा खुलेआमपणे करू शकला कारण गुंतवणूकदार, पत्रकार, नागरिक आणि राजकारणी सुद्धा अदानी उद्योग समूहाविषयी बोलायला घाबरतात.

हिंडेन बर्ग हि संस्था २०१७ मध्ये अमेरिकेत सुरू झालेली संस्था आहे. २०१७ पासून आज पर्यंत या संस्थेने सोळा कंपन्या विषयी अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये अहवाल प्रकाशित झाल्यानंतर प्रचंड घसरण झाली आहे. २४ जानेवारीला हिंडेन बर्ग संस्थेने अदानी ग्रुप समूहाविषयीचा अहवाल आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केल्यानंतर तीन दिवसात अदानी उद्योग समूहाचा भाग भांडवलात झालेली दोन बिलियन डॉलरची पडझड हेच दर्शवते की निदान गुंतवणूकदारांनी तरी हा अहवाल गांभीर्याने घ्यायला हवा.

आरोप केल्यानंतर अदानी ग्रुपच्या वतीने हे आरोप कुटील हेतूंनी केले गेले असून या आरोपांचा हेतू अदानी उद्योग समूहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचवणे आणि अदानी इंटरप्राईजेसच्या फॉलोऑन पब्लिक इशूला नुकसान पोहोचवणं हा आहे असे अदानी उद्योग समूहाने गुरुवारी जारी केलेल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे. तसेच हिंडेन बर्ग च्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या कायदेशीर कारवाईच्या इशाराचे स्वागत हिंडेन बर्ग ने केले आहे. अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या मनामध्ये झालेली हि घसरण तात्कालीन आहे की दीर्घकालीन असा प्रश्न आहे. दोन दिवसात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड पडझड झाल्यानंतर हे शेअर्स आता घ्यावेत की नाही याबाबत संभ्रम आहे. ज्यांनी हे शेअर्स आधीच विकत घेतलेले आहेत त्यांनाही शेअर्स ठेवावेत की विकावेत अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. माझ्या मते छोट्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये नव्याने गुंतवणूक करण्याआधी “वेट अँड वॉच” हा अँप्रोच ठेवावा कारण अदानी उद्योग समूहामधील घसरण तात्कालीक आहे की दीर्घकालीन या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही दिवस जाऊ द्यावे लागतील.

सध्या तरी “वेट अँड वॉच” हाच चांगला पर्याय आहे. सध्या सोशल मीडियावर अनेकांना हा प्रश्न भेडसावत आहे की अदानी उद्योग समूहाला कर्ज दिलेल्या बँका अडचणीत येऊ शकतात का, खाजगी बँकांनी अदानी उद्योग समूहाला पंधरा हजार कोटी रुपयांचं कर्ज दिले आहे, जे अदानी उद्योग समूहाच्या एकूण कर्जाच्या आठ टक्के आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४७ हजार कोटी रुपये कर्ज दिले ते एकूण कर्जाच्या पंचवीस टक्के आहे. अदानी उद्योग समूहाच्या शेअरच्या किमतीत सोमवार नंतर ही घसरण सुरूच राहिल्यास संबंधित बँकांना कर्ज वसुली करण्यास काही अंशी अडचणी निर्माण होऊ शकते.

सुमती डोंगरे
– (मुक्त पत्रकार)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय