Monday, July 1, 2024
Homeजिल्हाPune : शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडाप्रबोधिनी मध्ये २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रीया...

Pune : शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडाप्रबोधिनी मध्ये २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रीया सुरू

पुणे दि. २८ : महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार आणि अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत असलेल्या ९ क्रीडाप्रबोधिनीत सरळप्रवेश (५० टक्के) व कौशल्य चाचणी (५० टक्के) प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. (Pune)

राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद,गडचिरोली अशा ९ ठिकाणच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. ज्यूदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबलटेनिस, वेटलिप्टींग, ट्रायथलॉन, सायकलिंग आणि बॉक्सींग अशा १७ क्रीडाप्रकारात प्रशिक्षण देण्यात येईल.

सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले १९ वर्षाआतील खेळाडूंची तज्ज्ञ समितीसमोर संबंधित खेळाबाबतची चाचणी घेवून प्रवेश निश्चित केला जातो.

खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रीयेअंतगर्त क्रीडा प्रबोधिनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी १९ वर्षाआतील खेळाडूंसाठी संबंधित खेळाच्या कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. क्रीडा चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिकदृष्टया सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते. (Pune)

पात्र खेळाडूंनी ५ जुलै २०२४ रोजी पूर्वी आपला प्रवेश विनंती अर्ज आवश्यक प्रमाणपत्र जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांचेकडे द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव ₹कसगावडे यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !

प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात महावितरणचा मोठा निर्णय

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय