Sunday, December 22, 2024
Homeराज्यअभिनेत्री काव्या थापरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अभिनेत्री काव्या थापरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Photo : Facebook / Kavya Thapar

मुंबई : अभिनेत्री काव्या थापरला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा आणि एका व्यक्तीला धडक दिल्याचा काव्यावर आरोप आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला थांबवल्यावर तिने पोलिसांशी हुज्जत घातली आणि अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक केली. त्यानंतर तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

काव्या प्रामुख्याने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करते. काव्या पहिल्यांदा हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. पतंजली, मेक माय ट्रिप अशा अनेक मोठ्या ब्रँडसाठी त्यांनी जाहिराती केल्या आहेत. तिचा पहिला तेलगू चित्रपट Ee Maaya Peremito हा 2018 मध्ये प्रदर्शित झाला.

व्हिडिओ : किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मोत्सव सोहळा एका क्लिकवर पहा !

 

थापर यांचा जन्म 20 ऑगस्ट 1995 रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. काव्या तिच्या हॉट फोटोशूटसाठी ओळखली जाते. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

धक्कादायक ! अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या १३ वर्षाच्या मुलाचा आईने केला गळा आवळून खून

विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !

संबंधित लेख

लोकप्रिय