Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची रंगली चर्चा !

आपडी थापडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱया अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत ‘आपडी थापडी’ हे बडबडगीत म्हटलं आहे.

आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे, तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची मजेशीर गोष्ट उलगडणार आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles