Saturday, January 28, 2023
HomeNewsमुंगसालाही होतीये टपरीवरील चहाची तलफ ; पंढरपुरातील चहाप्रेमी मुंगूस !

मुंगसालाही होतीये टपरीवरील चहाची तलफ ; पंढरपुरातील चहाप्रेमी मुंगूस !

मित्रांचा, ऑफिसमधल्या सहकाऱयांचा मन मोकळं करण्याचा कट्टा म्हणजे चहाची टपरी. टपरीवरचा चहा म्हटलं की नाही म्हणणारी खूप कमी माणसं आपल्याकडे दिसून येतात. मात्र, याच चहाची तलफ एका मुंगसाला लागल्याचे पंढरपुरात समोर आले आहे.नित्यनेमाने सकाळी नऊ वाजता चहाच्या टपरीवर येऊन आपली तलफ भागवण्याचा दिनक्रम या मुंगसाने अंगीकारल्याचे दिसून येत आहे.

अचंबित करणाऱया या घटनेविषयी सचिन देशमाने सांगतात, हे मुंगूस गेली सहा महिने चहा प्यायला येते. सकाळी 9 ते 10 ही त्याची वेळ आहे. मी ग्राहकांच्या गडबडीत असलो तरी माझे लक्ष वेधण्यासाठी टपरीच्या मागे असलेल्या पत्र्याच्या गेटला शेपटी मारून ‘मी आलो आहे’ याची जाणीव करून देते. एका प्लेटमध्ये त्याला चहा ठेवावा लागतो. चहा फार गरम असेल तर प्लेट हलवून ते थंड करते आणि नंतर पिते.

सहा महिन्यांपूर्वी चहाच्या गाडय़ाभोवती सतत घुटमळत असल्याने त्याला चहा ठेवला होता. तेव्हापासून त्याला चहाची चटक लागली. आता न चुकता न भिता अगदी रुबाबात ते टपरीवर चहा प्यायला येते. या मुंगुसाचे हे चहा पिणे बघण्यासाठी लहान मुले आणि त्यांचे पालक मोठय़ा प्रमाणावर गर्दी करत आहेत.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय