Photo : Amir Khan |
मुंबई : दुष्काळ निवारणासाठी पाणी फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी काम करणारा अभिनेता अमीर खानने आता सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.
पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत सोयाबीन शेती कशी करावी, उत्पादन कसे वाढवावे यासाठी सोयाबीन शाळा भरविण्यात आली होती, यासोबतच पाणी फाउंडेशनने सोयाबीन शेतीसाठी ऑनलाईन पुस्तिका तयार केली आहे.
बाबा राम रहीमची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दिली झेड प्लस सुरक्षा
या पुस्तिकेचे अनावरण अमीर खान यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन केले. सोयाबीन शेतीसह संपुर्ण शेती कशी करावी यासाठी ऑनलाईन सोयाबीन शाळा महत्वाची ठरणार आहे.
या ऑनलाईन शेतीशाळेसाठी तब्बल ४६,३२७ शेतकऱ्यांनी या फॉर्म भरला होता. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि २५५ तालुक्यातील लोकांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी शेतकऱ्यांना या अभियानाचा येणाऱ्या काळात नक्कीच फायदा होईल असा विश्वास अमीर खान यांनी व्यक्त केला होता.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !