पुणे : बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेत पीडित मुलगी शाळेमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केली घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
मात्र घडल्या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध 376 आणि पोक्सो (POCSO) कायद्यानुसार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पकडण्यासाठी तातडीने पथक तयार करण्यात आले.
संतापजनक ! बापानंच केला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचे स्केच काढले, त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तपास सुरु असताना आरोपी जनवाडी भागातील दारू गुत्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी (Police) त्याठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मंग्या (वय – 32) असून शाळेत वॉचमन म्हणून काम करता असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन !
मातीशी इमान राखून विषमुक्त शेती पिकवा – बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे
धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, १७ वर्षीय आरोपी अटक तर दोन फरार