Sunday, December 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते 

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते 

State Ministers : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. मात्र, खातेवाटपाबाबतची घोषणा होत नव्हती. आता या खातेवाटपाबाबत सस्पेन्स संपुष्टात आला आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे गृहमंत्रालय सोपवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये काही नव्या मंत्र्यांना देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. हे खातेवाटप हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.  

कोणाला कोणतं खातं? (State Ministers)

देवेंद्र फडणवीस – गृह, उर्जा, कायदा, माहिती – प्रसिद्धी, सामान्य प्रशासन

अजित पवार – अर्थ – नियोजन, उत्पादन शुल्क

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण, सार्वजनिक बांधकाम

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती

लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !

‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला

बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

संबंधित लेख

लोकप्रिय