Monday, July 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतुटलेल्या चेंबर्स आणि खड्ड्यामुळे अपघात - अमोल भालेकर यांचे आयुक्तांना निवेदन

तुटलेल्या चेंबर्स आणि खड्ड्यामुळे अपघात – अमोल भालेकर यांचे आयुक्तांना निवेदन

त्रिवेणीनगर ते तळवडे तळवडे IT पार्क रस्त्याची दुरवस्था आणि वाहतूक समस्या  

पिंपरी चिंचवड : त्रिवेणीनगर चौक ते तळवडे गाव या मुख्य रस्त्याची खूप दुर्दशा झाली असून हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा झाला आहे. या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत, काही जीवघेणे सुध्दा ठरले आहेत. या ठिकाणी दोन अपघाती मृत्यू झाले आहेत. या रस्त्याची मुख्य समस्या म्हणजे असमतल डांबरीकरण आणि तुटलेले स्टॉर्म वॉटर चेंबर. 

तुटलेल्या चेंबर्समुळे आणि त्याठिकाणी झालेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पाठीचे, मणक्याचे आजार होण्याची शक्यता आहे. वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तळवडे IT पार्ककडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असुन यामुळे शहराची प्रतिमा खराब होत आहे. असमतल डांबरीकरणामुळे वाहने घसरून जीव जाण्याचे प्रसंगसुद्धा घडले आहेत. तरी आपण पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी. अशी मागणी शिव योद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल भालेकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी


पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

निवेदनात असे म्हटले आहे की, सदर रस्तावरील दुभाजकातून असलेले छेद रस्ते ठिकठिकाणी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. परंतु काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत, आज पर्यत या रस्त्यावर दोन मृत्यू झाले आहेत. शहराचे प्रशासक म्हणून आपण या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून पावसाळ्या पूर्वी कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय