Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात शरद पवार बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग आणि परभणी दौऱ्यावर असताना घडला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही, मात्र ताफ्यातील काही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर शरद पवार परभणीला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रवाना झाले होते. त्यांचा ताफा परभणीच्या दिशेने जात असताना, रुग्णवाहिकेने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील गाड्या धडकल्या. या गाड्यांपैकी एका गाडीत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर बसले होते.
या अपघाताचा व्हिडीओ घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शरद पवार यांची कार सुरक्षित अंतरावर असल्याने त्यांना कोणताही त्रास झाला नाही. अपघातानंतर ताफ्याने परभणीकडे मार्गक्रमण केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही.
Sharad Pawar
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट घेणार
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते खाते
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती
खूशखबर : बँकेत तब्बल 13 हजार पदांसाठी मेगा भरती
पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती
ITI, डिप्लोमा, इंजिनिरिंग, पदवीधरांसाठी विविध पदांची भरती
लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !
‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला