औरंगाबाद : औरंगाबाद ते नगर रोडवरील कायगाव जवळ मालवाहतूक करणारे चारचाकी वाहन आणि बलेनो कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एका ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाला.
पिकअप वाहनातून लोखंडी सळ्या आणि अँगल घेऊन जाणाऱ्या पिकअपला कारने पाठिमागून धडक दिल्याने भयंकर अपघात झाला. पिकअपमधील लोखंडी सळ्या आणि अँगल या कारमधील ठेकेदाराच्या कारच्या आरपार घुसल्या. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास औरंगाबाद-नगर रोडवरील कायगाव जवळ घडली. या अपघात ठेकेदार गंभीर जखमी झाला. त्यांना बजाजनगर येथील खासगी रुग्णालयात व नंतर घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ते वाळूज एमआयडीसी आणि परिसरातील उद्योगांना कामगार पुरवण्याचे काम करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज येथील अविनाथ कॉलनीत राहणारे किशोर नानासाहेब कळसकर हे बुधवारी रात्री बलेनो कारमधून औरंगबाद-नगर रोडने जात होते. त्याचवेळी पिकअपच्या चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कळसकर यांची कार थेट पिकअपला पाठिमागून धडकली. त्यामुळे कारच्या आरपार घुसल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तरूणीने केले स्वत: शी लग्न, सोशल मीडियावर तुफान चर्चा
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी