Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरJunnar : जुन्नरमध्ये ट्रॅक्टर पलटून शेतकऱ्याचा मृत्यू !

Junnar : जुन्नरमध्ये ट्रॅक्टर पलटून शेतकऱ्याचा मृत्यू !

Junnar (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे (23 जून) रात्री 11:15 वाजता एक दुर्दैवी घटना घडली आहे. कैलास शंकर ताजने (वय 62 वर्षे), निवासी बस्ती, सावरगाव, हे आपल्या शेतात स्वराज कंपनीचा 724 मॉडेल ट्रॅक्टर (MH-14/D.H.3728) चालवत असताना अपघात झाला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Junnar)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजने हे रात्री 11.15 वाजता आपल्या ट्रॅक्टरने शेतात जात होते. तेव्हा बस्ती, सावरगाव येथील त्यांच्या शेतात ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ताजने गंभीर जखमी झाले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात भा. द. वि. क. 279, 337, 338, 427, 304(अ) आणि मोटर वाहन कायदा क. 184 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विनोद भगत यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहित आहे. (Junnar)

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस फौजदार मुठे करीत आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

संबंधित लेख

लोकप्रिय