Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : ‘मनसे’चा गुढीपाडवा मेळाव्यास तब्बल तीन हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दरवर्षीप्रमाणे येत्या ०९ एप्रिल रोजी मुंबई येथे शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुढीपाडवा मेळाव्याचे ‘MNS’ Mumbai meeting आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी मनसे सज्ज झाली असून पिंपरी चिंचवड शहरातून तब्बल तीन हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.

याबाबत सचिन चिखले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनसेचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याची मनसे सैनिकाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मेळाव्यासाठी पिंपरी पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष व विविध विंगचे शहराध्यक्ष यांनी संपूर्ण शहर पिंजून काढून प्रभागा-प्रभागात बैठका पार पाडल्या.यावेळी २०० चारचाकी वाहने, १०० बसेस रवाना होणार आहेत. यात तब्बल दोन ते तीन हजार मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहतावर्ग येणार आहे.

दरम्यान, देशातील लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या गुढीपाडवा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्याला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? मनसेची युती होणार की नाही? निवडणुकीबाबत मनसेची भूमिका काय असेल? मनसे लोकसभा लढणार किंवा नाही? अशा निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांना राज ठाकरे काय उत्तर देणार? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles