नवी दिल्ली : घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा पराभव करणे आवश्यक आहे. यासाठीच २०२४ च्या लोकसभा निवडणुका भारताच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा (D Raja) यांनी एका मुलाखतीत केले.
नोकऱ्यांबाबत, काळा पैसा परत आणण्यात आणि महागाईवर मात करण्यात पंतप्रधान मोदी अपयशी ठरले आहेत, असे ते म्हणाले. २०२४ च्या निवडणुका देशासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी अतिशय गंभीर आहेत. गेल्या १० वर्षांपासून आपण जे पाहिले ते एक विनाशकारी शासन आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. संसद निरर्थक होत आहे, असे ते (D Raja) म्हणाले.
गेल्या हिवाळी अधिवेशनात संसदेतून १४० हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले हे अभूतपूर्व आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले
Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात
ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा
सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट