Thursday, February 13, 2025

Hirda Guaranteed Rate : हिरडा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी

जुन्नर : राज्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि अकोले तालुक्यांतील आदिवासींच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळांची सरकारी खरेदी सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास महामंडळाने जाहीर केला. (Hirda Guaranteed Rate)

सुरू होणाऱ्या हंगामात बाळहिरड्याची खरेदी 170 रुपये प्रतिकिलो दराने सुरू करून हा दर टप्प्याटप्प्याने जसा बाजारात दर वाढेल तसा वाढविण्यात येईल, अशा प्रकारचे आश्वासन आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी किसान सभेला दिले आहे. (Hirda Guaranteed Rate)

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या मागणीसाठी गेले तीन वर्षे सातत्याने आंदोलने केली जात होती. नाशिक ते मुंबई लाँग मार्च व अकोले ते लोणी लाँग मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने ही मागणी प्राधान्याने करण्यात आली होती.

आदिवासी आयुक्त कार्यालय, नाशिक या ठिकाणीही याबाबत किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढून ही मागणी केंद्रस्थानी आणली होती. सातत्याचा पाठपुरावा व मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबरोबर झालेल्या बैठकांचा परिणाम म्हणून अंतिमतः सुरू होणाऱ्या हिरडा हंगामामध्ये बाळ हिरड्याची सरकारी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Hirda Guaranteed Rate)

याबाबतचे परिपत्रक आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आले आहे. प्रथमच बाळहिरड्याला किमान आधारभूत दर जाहीर झाला आहे. हिरड्याला किमान 200 रुपये प्रतिकिलो हमीभाव मिळावा, ही मागणी किसान सभा करत आली आहे. किसान सभा हिरड्याला किमान प्रतिकिलो 200 रुपये भाव मिळावा, या मागणीवर ठाम आहे.

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू घोडे, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे यांनी ही मागणी केली आहे.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

Related Articles

- Advertisement -

Latest Articles