Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पदवीधरांसाठी रोजगार मेळावा

तरुणांना स्वयंसिद्ध होण्याची सुवर्णसंधी
– दि. १६ मार्च रोजी आकुर्डी येथे मार्गदर्शन
शिबीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड PCMC आणि परिसरातील तरुणांना स्वयंसिद्ध होण्यासाठी भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे. PCMC

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे आणि पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने केवळ पदवीधर तरुणांसाठी रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अजित गव्हाणे बोलत होते. PCMC

आकुर्डी प्राधिकरण येथील प्रा.रामकृष्ण मोरे आर्ट्स अँन्ड सायन्स कॉलेजमध्ये शनिवार, दि. १६ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत शिबीर होणार आहे. अधिक माहितीसाठी 8235909090 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

संधीचे सोने करुया… रोजगाराची कास धरुया : शेखर काटे

शेखर काटे म्हणाले की, राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या संकल्पनेतून उद्योगनगरीतील तरुणांना स्वयंसिद्ध होण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून आम्ही निर्माण केली आहे. नामांकीत ६० कंपन्यांचे स्टॉल एकाच छताखाली लावण्यात येतील. त्यातून फार्मा एफएमसीजी, बँकींग, आयटी, रिअल इस्टेट, इन्शुरन्स, ॲग्रीटेक, हेल्थकेअर अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांनी संधीचे सोने करावे आणि रोजगाराची कास धरावी, असे आवाहन करीत आहोत.

सदर पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे इन्स्टिट्यूट डायरेक्टर चेतन गवळी, माजी नगरसेवक भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, प्रशांत सपकाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, गणेश गायकवाड, संकेत जगताप, भागवत जवळकर, ओंकार विनोदे, आधी पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---
whatsapp link

हे ही वाचा :

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

---Advertisement---

मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू

यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत मिळणार राज्य सरकारचा निर्णय

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles