(प्रतिनिधी) :- नवनिर्वाचित तरूण तडफदार सरपंच मुकुंद घोडे आणि अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकाराने पिंपरवाडी, आंबे या गावात मनरेगा अंतर्गत ४५ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
आज सकाळी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामांना सुरुवात करण्यात आली. कोरोना आणि लॉकडाउन यामुळे आर्थिक संकटात सापडलेले ग्रामस्थाना गेली चार महीने कुठलाही रोजगार उपलब्ध नसल्याने घरातील आर्थिक गणित बिघडले होते. याच पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि संस्था यांच्या पाठपुराव्यामुळे पुणे जिल्हा परिषदेने मनरेगा विशेष अभियान राबवून सर्वसामान्याना दिलासा दिला.
हे अभियान गावात यशस्वी राबविण्यासाठी सरपंच मुकुंद घोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबे-पिंपरवाड़ी या गावातुन जवळपास १५० मजूरांचे फॉर्म भरून ते जमा केले होते. गावची लोकसंख्या जेमतेम ८०० त्यापैकी जवळपास १५० लोकांनी कामाची मागणी करणारे आंबे हे बहुदा पहिलेच गांव असावे. हिरडयाचा हंगाम संपल्याने कुठलाही रोजगार नसल्याने ग्रामस्त रोजगार मिळण्याच्या प्रतिक्षेत होते, अखेर सरपंच मुकुंद घोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करुन ११ जून रोजी ४५ मजूरांच्या हाताला काम उपलब्ध करुण दिले. उर्वरित १०० मजूरांना येत्या दोन दिवसात काम उपलब्ध करुण दिले जाईल असे सरपंच मुकुंद घोडे यांनी सांगितले.
यावेळी ग्रामसेवक लहू भालिंगे यांनी योजनेची संपूर्ण माहिती कामगारांना समजून सांगितली व सरपंच मुकुंद घोडे यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करून करण्यात आले.
पूर्वी रोजगार मिळवण्यासाठी 20 ते 25 km लांब जावे लागत होते, त्यासाठी पहाटे 3 वाजता उठावे लागत असे, घरातील सर्व कामे आटपुन कामाला जावे लगायचे, आणि घरी यायला रात्रीचे 9 वाजायचे. परंतु, अवघ्या ८ दिवसांपूर्वी सरपंच झालेले मुकुंद घोडे यांनी ग्रामस्थांना काम उपलब्ध करुन दिल्याने ग्रामस्थांंमधून सरपंचांचे कौतुक होत आहे.
यावेळी ग्रामरोजगार सेवक संदिप शेळकंदे, कॉम्रेड गणपत घोडे, प्रा. सावले सर , आणि ग्रामस्थ उपस्थित होते.