नाशिक : आदिवासी (Tribal) समाजाची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत (Actress Rakhi Sawant) वर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कारवाई करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, अश्लील वक्तव्य करून आदिवासी समाज मध्ये संपूर्ण असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे नट राखी सावंत यांच्या वर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा युवा कार्याध्यक्ष मोहन खाडे, नाशिक शहर अध्यक्ष तुषार पवार, शहर उपाध्यक्ष अजय टोंगारे, प्रतिक झिले, महादु बेडकोळी, दिलिप बोकड, मोहन पवार, परशुराम गोतवणे, अयक्ष खाडे आदी उपस्थित होते.
ब्रेकिंग : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक
बॉम्बे उच्च न्यायालयात 25 रिक्त जागांसाठी भरती, 50,000 रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !