पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: निगडी येथील चिंचवड मल्याळी समाज संचलित सीएमएस इंग्रजी माध्यम उच्च माध्यमिक विद्यालयाने नुकतेच शाळेच्या आवारात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.प्रदर्शनाचे उद्घाटन
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था कार्यालयीन संचालक डॉ.हिमांशू शेखर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.शेखर म्हणाले कि,विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन करण्यावर भर दिला पाहिजेत. अशा विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे नामांकित असे वैज्ञानिक घडतील. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक पध्दतीने केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविक प्राचार्या बीजी गोपकुमार यांनी केले. अध्यक्षीय भाषण सीएम एसचे अध्यक्ष टी पी विजयन यांनी केले.हे प्रदर्शन शाळेचे प्राचार्य डॉ.बिजी गोपकुमार पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुक्रमे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सरचिटणीस सुधीर सी.नायर,खजिनदार पी.अजयकुमार,उपाध्यक्ष पी.श्रीनिवासन आणि इतर समिती सदस्य,लेडीज विंगच्या संयोजक प्रवीजा विनीत,रवी नायर मातृभूमी न्यूज-पुणे शाखा आणि पालक सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनाला पालकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला,कार्यक्रमाची सांगता प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.