Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:राजमाता जिजाऊमुळे स्वराज्य - काशिनाथ नखाते

PCMC:राजमाता जिजाऊमुळे स्वराज्य – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.१२ – राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्यात आदर्श निर्माण केला जिजाऊ आणि राजे शिवबानी रयतेला आपुलकी जिव्हाळा आणि आधार दिला. जिजाऊ शूर, बुद्धिमान, निर्भीड धैर्यशाली होत्या , महत्त्वकांक्षी नियोजनामुळेच स्वराज्य झाले असे गौरवोद्गार कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी काढले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र बांधकाम कामगार समन्वय समिती तर्फे आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतिनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव,फरीदशेख,सलीम डांगे, मनोज यादव,बालाजी बिराजदार,मुमताज शेख
अश्विनी जगदाळे,ज्योती डिम्बर,उज्वला मधुरे
रुक्मिणी इनामके,सुरेश खेत्रे,भारत रुपटक्के आदी उपस्थित होते.

जुलमी मोघलांच्या अन्यायामुळे सर्वत्र गुलामीचा अंधार पसरलेला होता रयत आणि महिला आत्याचाराविरोधात जाऊन जिजाऊ यांनी स्वराज्याची ज्योत पेटवण्याचे काम त्यांनी केले आणि सुराज्याचा प्रकाश रायतेला दिला. कमी सैन्यबळ असले तरी लढू आणि जिंकू शकतो हा विश्वास त्यानिं मावळ्यांना दिला ही स्फूर्ती घेऊन अनेक वर्षे मावळे मोघलाविरुद्ध लढले आणि आदर्श राज्य निर्माण केले या संकल्पना आजही आपणास मार्गदर्शक ठरतात .

संबंधित लेख

लोकप्रिय