Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड'वुई टुगेदर फाऊंडेशन' च्या वतीने खटकाळे येथे शैक्षणिक साहित्य वाटप

‘वुई टुगेदर फाऊंडेशन’ च्या वतीने खटकाळे येथे शैक्षणिक साहित्य वाटप

जुन्नर : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे येथील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे वितरण वुई टुगेदर फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास झाडे होते.

तसेच यावेळी वुई टुगेदर फाऊंडेशन चे संस्थापक सदस्य नवनाथ मोरे, सामाजिक कार्यकर्ते विलास मोरे, काशिनाथ भवारी, गोपाळ मोरे, एसएफआय चे जिल्हा समिती सदस्य राजू शेळके, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, एसएफआय अध्यक्ष अक्षय साबळे, खटकाळे-खैरे गावचे सरपंच बाळू केदारी, माजी सरपंच नथू झाडे, मुख्याध्यापक यु.एच.भोसले, ग्रामसेवक वारे भाऊसाहेब, एसएफआय चे निलेश मोरे, शितल भवारी, सुरज बांबळे, सिताराम गागरे, अमित मोरे, रोहित मोरे, योगेश मोडक उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनाथ मोरे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शाळेच्या मागणीनुसार आदिवासी विद्यार्थ्यांनी देखील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करावे, यासाठी संस्थेने ही पुस्तके दिली आहे. आमची संस्था स्वतः सभासदांच्या योगदानातून विविध उपक्रम राबवत असते. यापुढे गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मदत देत राहील.

यावेळी विलास मोरे यांनी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, जेणेकरून आपले नाव मोठे होईल. यावेळी काशिनाथ भवारी म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परिक्षेचा पाया आहे. आपण मोठे अधिकारी होण्यासाठी अभ्यास करावा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. 

मुख्याध्यापक यु.एच.भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. यावेळी रामदार झाडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे, पालकांचे, गावाचे आणि स्वतः चे नाव उज्ज्वल करण्यासाठी अभ्यास करावे, असे मार्गदर्शन केले.

यावेळी राजू शेळके, लक्ष्मण जोशी, अक्षय साबळे, खटकाळे-खैरे गावचे सरपंच बाळू केदारी, माजी सरपंच नथू झाडे, मुख्यमंत्री यु.एच.भोसले, एसएफआय च्या शितल भवारी यांनी देखील मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एस.लोंढे यांनी केले.

यावेळी शिक्षकवृंद एस.वाय.मुंढे, ई.जे.वीर, के.बी.पानसरे, एस.व्ही.थोरात, व्ही.व्ही.भोईर, के.पी.कांडे, कर्मचारी बी.के.साबळे आदींसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय