नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासींत समावेश करू नये. धनगड नाही, धांगड आहेत. धनगर ही जात आहे, जमात नाही. धनगर, धनगड हे दोन्हीही शब्द अनुसूचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही.तरीदेखील काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुचित घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणीचा पाठपुरावा करतांना दिसत आहे. या असंवैधानिक मागणीला विरोध करत तहसीलदार तळोदा यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन पाठविली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सुचित Dhangad या शब्दाचे भाषांतर धनगड असे केले जात आहे. ओराँन, धांगड या जमातीशी धनगर या जातीचा तीळमात्रही संबंध नाही. धनगर ही जात आहे,जमात नाही. ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही. धनगर आदिवासी नाहीत. त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करु नये. सुचितील शब्द धनगड किंवा धनगर नाही.
निवेदन देतेवेळी बिरसा क्रांती दलाचे राजेंद्र पाडवी, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चव्हाण, आदिवासी युवा शक्ती चे योगेश पाडवी, BRS चे अध्यक्ष राजू प्रधान, उपाध्यक्ष मंगल पाडवी, कपिल गावीत, रतीलाल पावरा, गुलाबसिंग वळवी, मगन नाईक, मांगीलाल वळवी, अविनाश पाडवी, मोग्या पाडवी, कालुसिंग वळवी, देवीलाल ठाकरे, वासुदेव वळवी, विरसिंग पाडवी, राकेश पाडवी हे उपस्थित होते.