Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कर्मवीर भाऊरावांमुळेच सुसंस्कृत बलशाली राष्ट्राचा पाया - काशिनाथ नखाते

PCMC : कर्मवीर भाऊरावांमुळेच सुसंस्कृत बलशाली राष्ट्राचा पाया – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि .२२ – शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या गरीब मुले शिक्षण घेऊ शकत नव्हती, दूर दूरवर शाळा नव्हत्या अशा काळात बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी कमवा व शिका योजनेद्वारे गरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून उच्च शिक्षण घेण्याचे पथदर्शी नियोजन राजर्षी शाहूंच्या विचाराचा प्रभाव असणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आणि यामुळे महाराजा सयाजीराव मोफत व निवासी रूपात १०१ हायस्कूल निर्माण करून शिक्षणाचे द्वारे खुले करून सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न बलशाली राष्ट्राचा पाया रोवला असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांचे वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मानवशक्ती ट्रस्ट चे अध्यक्ष महेश स्वामी, महिला कार्याध्यक्ष मुमताज शेख, नागेश आवताडे, शोभा ओव्हाळ,शोभा सदाशीव ,ओमप्रकाश मोरया, सलीम डांगे, कनिष्क सदांशीव, बालाजी लोखंडे ,मनोज यादव आदी उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अन्याय, विषमता, अत्याचार विरोधात दंड थोपटले १९१९ ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून खेडोपाडी , गावोगावी प्राथमिक शाळांचे जाळे उभारले याची संख्या ५३८ पर्यंत पोहोचवली. विद्यार्थी, शिक्षण,घडणारा समाज यावर अतिशय स्पष्ट व आजही मार्गदर्शक ठरतील असे मौलिक विचार आहेत, शिक्षणातून नवचैतन्य नव संस्कृती आणि नवीन समाज जन्माला येतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तर शिक्षक हा ग्रामीण भागांचा खेड्यांचा आदर्श ग्रामसेवक आणि प्रभावी ग्रामनायक असावा असे ते नेहमी म्हणत असत.

संबंधित लेख

लोकप्रिय