पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली येथील उषा विक्रम छाजेड यांच्या दुकानात तहसिलदार गजानन देशमुख व पुरवठा निरीक्षक वंदना साबळे यांच्या हस्ते आज आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिधापत्रिका धारक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्डधारकांना शिधा वाटप वेळेवर व्हावे यासाठी रेशन दुकानदारांनी दिवसभर दुकाने सुरू ठेवली आहेत. रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या कार्डधारकास शिधा वितरण रेशनदुकानदार करणार आहेत, असे आवाहन नायब तहसीलदार गजानन देशमुख यांनी सांगितले.
पुरवठा निरीक्षक वंदना साबळे यांनी यावेळी सांगितले की, कार्डधारकांनी बँकेच्या पुस्तकासारखे त्याची जपणूक करा. प्रत्येकाला त्याचे हक्काचे रेशन, आनंदाचा शिधा वेळेवर मिळावा, म्हणून शहर अन्नधान्य वितरण विभागाचे कर्मचारी आढावा घेत आहेत.
स्वस्त धान्य दुकान संचालक उषा छाजेड व वैभव छाजेड म्हणाले की, आमच्या १५०० कार्डधारकाना राज्य सरकारने गणपती सणाची ही गोड भेट दिली आहे. दुकान ग्रामीण परिमंडळ विभागात आहे. कोरोना काळातही आम्ही आमची सेवा निरंतर सुरू ठेवली होती, असे वैभव छाजेड म्हणाले.