Monday, December 23, 2024
Homeआंबेगावआंदोलन करणाऱ्या मराठा समाजबांधवांवर झालेल्या हल्याचा माकप आंबेगाव कडून तीव्र निषेध 

आंदोलन करणाऱ्या मराठा समाजबांधवांवर झालेल्या हल्याचा माकप आंबेगाव कडून तीव्र निषेध 

घोडेगाव : जालन्याजवळील आंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या व त्यासंबंधी इतर मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलक महिला, पुरुष यांच्यावर पोलिसांनी निर्घृण हल्ला केलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या अमानुष कृत्याचा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आंबेगाव तालुका समिती या घटनेचा जाहीर निषेध केला. त्यासंबंधी निवेदन नायब तहसीलदार ए.बी.गवारी यांना माकपा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने देण्यात आले. CPIM Ambegaon strongly condemns the attack on the protesting Maratha community members

यावेळी निवेदनाच्या माध्यमातून माकप आंबेगाव तालुका समितीने, या पोलिसी अत्याचारास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांस ताबडतोब निलंबित करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे व दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी माकप आंबेगाव तालुका समितीचे अशोक पेकारी, राजू घोडे, रामदास लोहकरे, बाळू काठे, कृष्णा वडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय