Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

उपयोगकर्ता शुल्क संदर्भात तात्पुरती मलमपट्टी : चेतन बेंद्रे

करदात्यांच्या लुटीचे डाव कायमस्वरूपी बंद करा : आप

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: मालमत्ता कराचे स्वरूप राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील नागरिकांना एक सारखे आहे परंतु फक्त पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी उपयोगकर्ता शुल्क लादण्यात आले आणि आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक होईपर्यंत या शुल्काची तात्पुरती वसुली बंद करून आजचे मरण उद्यावर ढकलण्याची कसरत हे सरकार करत आहे. असा आरोप करत उपयोगकर्ता शुल्क कायम स्वरुपी रद्द करण्याची मागणी आपचे चेतन बेंद्रे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेतील नागरिकांसाठीच उपयोगकर्ता शुल्क लागू का केला गेलाय याचे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले नाही. पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे, म्हणून फक्त आम्हालाच लूटताय का असा सवाल यावेळी बेंद्रे यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये याबाबत सविस्तर बैठक घेण्यात येईल आणि तोपर्यंत ही वसुली थांबवणे म्हणजे जखमेवरती तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपयोगकर्ता शुल्क आकारणी करावी, अशी अधिसूचना दि. १ जुलै २०१९ रोजी जाहीर केली होती, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी राज्यात आणि पालिकेत सत्ते मध्ये होती. आधीच पिंपरी चिंचवड मनपा ने सोसायट्यातील घनकचऱ्याची हाताळणी व व्यवस्थापन करणे बंद केले आहे आणि आता मागील ४ वर्षाच्या दंडासहीत उपयोगकर्ता शुल्क वसुली सुरू केली आहे. शिंदे सरकारने पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसोबत दुजाभाव करू नये व कायम स्वरूपी उपयोगकर्ता शुल्क रद्द करून आणि करदात्यांच्या लुटीचे डाव कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी आम आदमी पार्टी करत आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

---Advertisement---

PCMC : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, राहुल कलाटे यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles