Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : आज लागणार दहावीचा निकाल, असा पहा निकाल

SSC Board Result : बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. आता दहावीच्या निकालाचीही प्रतिक्षा संपली आहे. आज ( २ जून) रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.

---Advertisement---

मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची लेखी परीक्षा आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली. या निकालाची प्रतिक्षा आज अखेर संपली आहे.

असा पहा निकाल :

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना रोल नंबर किंवा आईचे नाव टाकावे लागणार आहे. त्यानंतर स्क्रिन वर आपल्याला निकाल पाहता येणार आहे. तसेच तो निकाल डाऊनलोड करू घेता येणार आहे. यामध्ये या विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी दिली असणार आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.ssc.mahresults.org.in

www.hsc.mahresults.org.in

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles