Thursday, February 13, 2025

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची पोस्टरबाजी…

पुणे : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विलास लांडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छांच्या पोस्टरवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. तर विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्याचीच मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका आहे. शेवटी पक्षश्रेष्ठ ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची. जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करेल, असं विलास लांडे म्हणालेत.

मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून शंभर टक्के निवडून येईल, असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.

दिलीप वळसे पाटील यांचेही नाव चर्चेत…!

तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून असल्याने दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चाही या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही नाव पुढे आल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

Related Articles

- Advertisement -

Latest Articles