आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे, ते तपोवन संस्थेस देऊ नये अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहर, पुणे जिल्हा रिपब्लिकन सेनायांचे वतीने खेड तहसीलदार वैशाली वाघमारे, प्रांत खेड गोविंद शिंदे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने आळंदी सिद्धेबेट हे सिद्धबेट कायम रहावे, ते तपोवन संस्थेस न देण्या बाबतचे निवेदन संबंधित कार्यालयात देण्यात आले आहे. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांनी निवेदन स्वीकारले. रिपब्लिकन सेने तर्फे पुणे जिल्हा अद्यक्ष संदीप रंधवे, आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, मनसे तर्फे खेड तालुका उपाध्यक्ष रस्ते साधन सेवा सुविधा खेड तालुका उपाध्यक्ष किरण नरके, सहदेव गोरे, परमेश्वर बडबडे, मयूर पेटकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये स्थान महात्म्य जोपासण्यास तसेच पावित्र्य राखण्यास सेवाभावी संस्थासह आळंदी नगरपरिषद यांनी कामकाज सुरू केले आहे. आळंदी हद्दीतील आळंदी सिध्दबेट हे सिध्दबेट राहावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी संबंधित प्रकल्प आणि जागा आळंदी नगरपरिषदकडे राहावी अशी मागणी करण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषदेकडे देखभाल दुरुस्ती आणि विकास कामासाठी सद्या असून भविष्यात हि कायम राहावे. आळंदी नगरपरिषदेची ही मागणी असून यापूर्वी यासाठी नगरपरिषदेने ठराव देखील केला आहे.
आळंदी नगरपरिषद आणि विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, यांनी प्रयत्न पूर्वक वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता करण्याचे सामाजीक बांधीलकीतून काम सुरू झाले आहे. यास अधिक गती देखील देण्यात आली आहे. सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे यासाठी स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून यापूर्वी केलेल्या प्रयत्नास यश येऊन आळंदीतून एक संस्था हद्दपार करण्यासाठी मोठे जनआंदोलन यापूर्वी उभे राहिले होते.
आळंदी नगरपरिषद हद्दीत आळंदी सिध्दबेट असल्याने आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडे सदर आळंदी सिध्दबेट विकास साधण्यासाठी , देखभाल दुरुस्ती करण्यास सुपूर्द करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी पूर्वीच आळंदी सिध्दबेटात सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण, संवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता कार्य सुरु झाले आहे. नागरिकांचा येथे प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. भाविक, नागरिक आळंदी सिध्दबेटास भेट देत आहेत. तपोवन सारख्या संस्थेला येथील जागा देण्याचा विषय असून आळंदी सिध्दबेट हे सिध्दबेट रहावे अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे. अशी मागणी मनसे, रिपब्लिकन सेना, आळंदी जनहित फाउंडेशन, स्थानिक आळंदीकर नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
जुन्नर : भरदिवसा आठवडे बाजारात तरूणीवर चाकूने भ्याड हल्ला, मदतीला आलेल्या महिलेवरही वार
“महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती