Thursday, February 13, 2025

मोठी बातमी : किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविले, “हे” असतील नवे कायदा मंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज मोठा फेरबदल केला आहे. केंद्र सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविण्‍यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरेन रिजिजू हे वर्तमान आणि निवृत्त न्यायमूर्तींबद्दलच्या टिप्पणीमुळे सातत्याने चर्चेत आले होते. आज रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविवण्‍यात आले आहे. त्‍यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांना कायदा मंत्री करण्यात आले आहे.

त्यामुळे आता अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदा मंत्री असणार आहे, तर किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

किरेन रिजीजू हे कायदा मंत्री झाल्यापासून त्यांची अनेक विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यामुळे भाजप पक्षाच्या प्रतिमेला फटका बसत असल्याचीही चर्चा होती. त्यानंतर आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

हे ही वाचा :

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

‘या’ वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यात तैनात न करण्याचे निर्देश

Related Articles

- Advertisement -

Latest Articles