Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयमोठी बातमी : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मृत्यू

मोठी बातमी : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मृत्यू

जम्मू – काश्मीर : जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आलं आहे. एनआयए याबाबतचे वृत दिले आहे.

दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. दहशतवाद्यांनी सोपोरमध्ये अरमापोरा येथील नाक्याजवळ पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन पोलीस आणि दोन नागरिकांचा समावेश आहे. तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

सोपोर येथील मंजूर अहमद शल्ला आणि बशीर अहमद या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी हे दोघंही रस्त्यावर चालत होते. या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचा हात असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी एनआयए या वृत्तसंस्थेला दिली.

 

संबंधित लेख

लोकप्रिय