Thursday, February 13, 2025

धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून प्रशासनाला त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंकमधील मैला सफाई करण्यासाठी चारजण आत उतरले. एका मागोमाग एक पाचजण टँक मध्ये गेले. त्यात पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. कोणीच बाहेर येत नसल्याने आरडाओरड झाली. त्यानंतर पोलिसही हजर झाले, त्यावेळी सिमेंटचे छत जेसीबीने फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. यात एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये शेख सादिक (वय 45, शेख शाहरूख (20), शेख जुनेद (वय 29), शेख नवीद (वय 25), शेख फिरोज (वय 19) यांचा समावेश असून शेख साबीर (वय 18) हा कामगार गंभीर अवस्थेमध्ये अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून मदत जाहिर

या घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles