बेंगळुरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी बेंगळुरूमधील मतदान केंद्रावर मतदान केले. सुरुवातीच्या मतदारांपैकी त्या एक होत्या. यावेळी विरोधकांना महागाईवर बोलण्याचा अधिकार नाही असे वक्तव्य सीतारामन यांनी केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बेंगळुरूच्या जयनगर येथील भरत एज्युकेशन सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदान केले. पत्रकारांशी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘मी महागाईवर जनतेसोबत आहे, हो, त्यांच्यावर बोजा टाकू नये, पण विरोधकांना (त्यावर बोलण्याचा) अधिकार नाही. त्यांचा कार्यकाळ पाहावा. असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, या मुद्द्यावर विरोधकांना बोलण्याचा अधिकार नसला तरी जनतेवर महागाईचा बोजा पडू नये, असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
संतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी