जुन्नर : भिवाडे (बुद्रुक) व भिवाडे (खुर्द) या ठिकाणी किसान सभेच्या वतीने हिरडा व घरकुलांच्या प्रश्नांबाबत बैठका घेण्यात आल्या.
हिरड्याला कमीत कमी ३५० रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचे हिरड्याच्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत अशा सर्व शेत कऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ज्या गरजू लाभार्थ्याला घर नाही अशा व्यक्तीला तत्काळ घर मिळाले पाहिजे. या प्रश्नांना घेऊन डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वात अकोले ते लोणी तीन दिवसीय पायी लाँग मार्च २६ ते २८ तारखे पासून करण्यात येणार आहे त्याची सुरुवात अकोले येथून करण्यात येणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा किसान सभेचे सचिव विश्वनाथ निगळे, एस.एफ.आय राज्य सचिव सोमनाथ निर्मळ , जुन्नर किसान सभेचे सचिव लक्ष्मण जोशी, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जुन्नर तालुका सचिव गणपत घोडे, हडसर गावचे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेळके, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, आंबे गावचे माजी सरपंच मुकुंद घोडे, संदीप शेळकंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
किसान सभा काढणार महसूल मंत्र्यांच्या घरावर पायी मोर्चा; हिरडा प्रश्नावरून आक्रमक पवित्रा
संबंधित लेख