Sunday, December 22, 2024
Homeराजकारणसंभाजीराजेंच्या अपक्ष उमेवारीमागे फडणवीसांची राजकिय खेळी शाहु महाराजांचे मोठे विधान

संभाजीराजेंच्या अपक्ष उमेवारीमागे फडणवीसांची राजकिय खेळी शाहु महाराजांचे मोठे विधान

कोल्हापूर : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्यानंतर संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली. संभाजीराजेंच्या अपक्ष उमेवारीमागे फडणवीसांची राजकिय खेळी होती असा गोप्य स्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहु महाराज यांनी केला आहे.

शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून संभाजीराजे प्रयत्नात होते. पण शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातल्याने संभाजीराजेंना राज्यसभेवर जाता आलं नाही. अपक्ष लढण्यावरच संभाजी छत्रपती अखेरपर्यंत ठाम होते. संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अनेक तर्क लढवले गेले. संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असे श्रीमंत शाहू छत्रपती महाजांनी म्हटले आहे.

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेच्या मैदानातून माघार घेतल्यानंतर शाहू छत्रपती महाराज यांनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही त्यांना भाजपची ऑफर स्वीकारू नये म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जे राजकीय निर्णय घेतले ते वैयक्तिक पातळीवर घेतले आहेत. यासाठी संभाजीराजे यांनी आमच्याशी आणि कुटुंबियांशी चर्चा केली नाही. त्यामुळं त्याचे निर्णय हे छत्रपती घराण्याचे निर्णय होते असं म्हणता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारली हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही, असेही श्रीमंत शाहु महाराज म्हणाले होते.

संभाजीराजेंना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला असं म्हणता येत नाही. कारण ही पूर्णपणे राजकीय भूमिका होती. संभाजीराजेंनी अपक्ष उभं राहावं ही भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांची खेळी होती. त्यांनीच त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास भाग पाडलं होतं, असं श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितलं.

आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार…

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 वी पास आहात ? मुख्यालय पूर्व कमांड मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

महिलांसाठी खूशखबर : राज्य सरकार देणार १ रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन

संबंधित लेख

लोकप्रिय