Wednesday, February 5, 2025

27 सप्टेंबर भारत बंदला बिरसा फायटर्सचा जाहीर पाठींबा – सुशीलकुमार पावरा

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या महागाई, अन्यायकारक कृषी कायदेे, बेरोजगारी, सरकारी संपत्तीचे खासगीकरण यांसारख्या गंभीर धोरणाविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटनांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी पुकारलेल्या भारत बंदला ‘बिरसा फायटर्स’चा देशभरातून जाहीर पाठिंबा राहील, असे बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी जाहीर केले आहे.

भारत बंदचे विषय हे सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. त्यामुळे बिरसा फायटर्स तर्फे पाठिंबा जाहीर करीत आहोत, असे बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी सांगितले. दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून बॅनर व घोषणा बाजीद्वारे बिरसा फायटर्स संघटना भारत बंदला सक्रिय पाठिंबा देईल असेही सुशीलकुमार पावरा म्हणाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles