Thursday, March 13, 2025

जातीअंत संघर्ष समितीतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन व संविधान दिन साजरा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : घरकुल चिखली पुणे येथे संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचनातून संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये याची माहिती देण्यात आली. जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष डॉ.किशोर खिल्लारे ह्यांनी सांगितले की, एकोणिसाव्या शतकात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी परिवर्तनाच्या दिशेने चक्र फिरवलं. त्यांनी सर्वप्रथम स्त्रीशिक्षणास सुरवात केली, विधवा व परितक्त स्त्रीयांना आधार दिला, दलित मुलांना शिक्षण व वसतिगृहाची सोय केली, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद खुला केला. हिंदु धर्मातील रूढी परंपरांना झुगारून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकऱ्यांचा आसुड व गुलामगिरी ही महत्त्वाचे पुस्तकं लिहून पुढिल काळाला प्रेरणा दिली.

भारतीय संविधान जनजागृती अभियानानिमित्त प्रमुख वक्ते अॅड.रविंद्र भवार ह्यांनी संविधानातील मुलभूत हक्क व ईतर महत्त्वाच्या तरतुदी सांगितल्या तसेच आपली जबाबदारी व कर्तव्य ह्याबद्दल सोप्या भाषेत सांगीतले. घटना मसुदा समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटना लिहीतांना त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हणुन त्यांना राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतात. संविधानात स्त्रीयांना समान अधिकार मिळाला व अस्पृश्यता नष्ट करण्याचे नमुद केले.
भारतीय संविधानाने अत्यंत महत्त्वाचा मतदानाचा अधिकार दिला ह्याद्वारे ग्रामपंचायत ते संसदेत प्रतिनिधी निवडून देता येतात. तेव्हा मतदानाचा अधिकार जबाबदारने वापरावा असे त्यांनी आवाहन केले.

ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व‌ सुत्रसंचलन अविनाश लाटकर ह्यांनी केले. त्यांनी जाती अंत संघर्ष समितीचे कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे संयोजन भार्गवी लाटकर, अनिरुद्ध चव्हाण, वंदना चव्हाण‌ ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमास गजराबाई इंगोले, रजनी अहीरे, अॅड. अमिन शेख, विशाल कामठे, राहुल माथवड, पार्वती चंदनशिवे, सय्यद अली हैदर, वर्षा कडाळे, सुजाता शिंदे, हर्षा जाधव, मंगल घोडके आदि बहुसंख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Lic

Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles