Wednesday, April 24, 2024
Homeराज्य10 डिसेंबर ला आशा व गटप्रवर्तकांचा देशव्यापी एल्गार, 'या' आहेत मागण्या

10 डिसेंबर ला आशा व गटप्रवर्तकांचा देशव्यापी एल्गार, ‘या’ आहेत मागण्या

सातारा : 19 ऑक्टोबर 2022 ला दिल्ली येथे झालेल्या संयुक्त कन्वेंशन मध्ये ठरल्याप्रमाणे आरोग्य अभियान व आशा व गटप्रवर्तक यांच्यासाठी जवाब दो आंदोलन 10 डिसेंबर या दिवशी देशभरात करण्याचे ठरले आहे. त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांनी हे जिल्हा पातळीवर 10 डिसेंबर हा मागणी दिवस व जवाब दो आंदोलन करण्याचे आहे. या आंदोलनामध्ये भोजन, आरोग्य व शिक्षा अधिकार व श्रम अधिकार यावर भर असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (CITU) च्या राज्य अध्यक्षा आनंदी अवघडे व महासचिव पुष्पा पाटील यांनी दिली. 

त्या म्हणाल्या, आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य खात्यात कायम कर्मचारी करा. तोपर्यंत किमान वेतनाच्या आधारावर आशांना 26000 व गटप्रवर्तकांना 28000 किमान वेतन द्या. तालुका पातळीवर समूह संघटक, एम पी डब्ल्यू यांची दादा दादागिरी त्वरीत थांबवा, आशा व गटप्रवर्तक यांना माणुसकीची वागणूक द्या, आशा व गटप्रवर्तक यांचे मानधन दर महिन्याच्या पाच तारखेला द्या, ज्या कामासाठी आशांना मोबदला मिळतो त्या कामाच्या रिपोर्टिंग साठी गटप्रवर्तकाना मोबदला मिळावा, विना मोबदला कोणतेही काम सांगू नये, आभा कार्ड काढणे व हेल्थ कार्ड काढणे या कोणत्याही कामाची सक्ती आशा व गटप्रवर्तक यांच्यावर करू नये, आदी मागण्यांना घेऊन स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आशा व गटप्रवर्तकांनी आपला न्याय हक्कांसाठीचा लढा बळकट करण्यासाठी सर्व ताकदीनिशी आंदोलन करावे, असेही आवाहन देखील केले आहे.

Lic

Lic

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय