जुन्नर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बिरसा मुंडा व राघोजी भांगरे जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना पवार होत्या. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव विश्वनाथ निगळे, किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचाचे संजय साबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, रोहिदास बोऱ्हाडे, राजू शेळके, संदिप मरभळ आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.