पुणे / आरती निगळे : शबरी व आदिवासी विकास महामंडळात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला.
जनजातीय गौरव दिवस यावर्षीपासून बिरसा मुंडा यांच्या जयंतीला साजरा होणार आहे. 19 व्या शतकामध्ये महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध ‘उलगुलान’ चा नारा देऊन आदिवासींना संघटीत केले होते. 1894 साली छोट्या नागपूर परिसरातील भीषण दुष्काळात कर माफी आंदोलन व भरीव कार्य केल्याने लोक बिरसा मुंडा यांना ‘धरती आबा’ भगवान म्हणू लागले. 1898 मध्ये छोटा नागपूर भागात स्वराज, जंगलराज निर्माण करून आदिवासींमध्ये आत्मसन्मान व विश्वास प्रस्थापित केला 9 जानेवारी 1900 च्या दिवशी इंग्रजांनी डोंबारी बुरुज पर्वतावर हल्ला करून भीषण गोळीबार केला यामध्ये बिरसा बिरसा आपल्या साथीदारांना समवेत तीर-कामठे घेऊन तीव्र प्रतिकार केला परंतु त्यात 200 पेक्षा जास्त आदिवासी शहीद झाले यास ‘डोंबारी बुरुज नरसंहार’ म्हणून ओळखले जाते नऊ जून 1900 रोजी जेलमध्ये गूढरित्या वयाच्या 25 व्या वर्षी या महानायकाचा अंत झाला यांची जयंती म्हणून आज जनजातीय गौरव दिवस साजरा केला गेला.
यावेळी महामंडळाचे महाव्यवस्थापक (प्रशासन) जालिंदर आभाळे, महाव्यवस्थापक (वित्त) मनोज शर्मा, ट्रायफेडचे गणेश धराडे, तसेच महामंडळाचे अधिकारी योगेश पाटील, प्रदीप सकट, प्रशांत ब्राम्हणकर, सागर पाटील, विशाल महाले, अभिजीत करवंदे, प्रशांत खामकर, महेंद्र बागुल, प्रदिप जाधव, अक्षय खिल्लारी आदी उपस्थित होते.