Friday, March 14, 2025

पुणे : कवि संतोष पावरा यांचा डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार प्रदान

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : नंदूरबार जिल्ह्यातील विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळ व आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते युवा कवि संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाला पुणे येथे डॉ माणिक शेकुबा विशेष सन्मान पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. पुरस्कारांचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानधन असे होते. 

पुणे येथील एस एम जोशी पत्रकार भवनात नुकतेच कवी मोतिराम जोगंदड यांच्या कविता संग्रहच्या निमित्ताने भव्य कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.श्रीपाल सबनीस, उद्गाटक जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, प्रमुख पाहुणे हनुमंत धानगडे,  प्रा. व्यंकटराव, प्रा.सुभाष वारे, अर्चना जोगंदड इत्यादी अनेक महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व उपस्थित होते. 

महाराष्ट्रच्या कानाकोप-या तून ९५ कवींनी आपली साहित्य कृती पुरस्कारासाठी पाठवले होते त्यातून विषेश सन्मानासाठी युवा कवि संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाची निवड करण्यात आली होती. 

२०१७ साली ढोल संग्रहाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती. ढोल संग्रहात ३१ कविता मराठी व  ४ हिंदी भाषेतील कविते सोबत आदिवासी पावरा बोली भाषेतील १७  कविता असे विशेषतः हा कविता संग्रह आहे. या संग्रहातील १० कविता भारतीय साहित्य अकादमीने निवड केले आहे. तसेच ढोल कविता संग्रहाला या पुर्वी देखील अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यात पुणे येथे मिळालेल्या या विशेष सन्मानामुळे ढोल कविता संग्रहाची साहित्यिक क्षेत्रात भरभरुन कौतुक होत आहे. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles