Thursday, September 19, 2024
HomeNewsनाशिक : सिन्नर येथे एक दिवासीय कार्यक्रम संपन्न

नाशिक : सिन्नर येथे एक दिवासीय कार्यक्रम संपन्न

नाशिक : दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड, प्रादेशिक संचालनालय – नाशिक व नगरपरिषद सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी एक दिवसीय डिजिटल व फायनान्शियल लिटरसी एक दिवसीय प्रशिक्षण (STTP) कार्यक्रम आयोजित केल्या गेला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन विष्णू हाडके, लेखापाल – नगर परिषद सिन्नर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाले.

या कार्यक्रमासाठी 100 महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमात डिजिटल व आर्थिक साक्षरता या विषयी अनिल जाधव, शहर अभियान व्यवस्थापक, महिला कामगार कायदयाची माहिती ऍडव्होकेट ज्योती सोनवणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनाची माहिती श्रीमती सारिका डफरे, प्रभारी प्रादेशिक संचालिका यांनी दिली.

कार्यक्रमाचा समारोप रोहित पगार, उप कार्यकारी अधिकारी, नगर परिषद सिन्नर यांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थिना प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रीमती सुनंदा सोनवणे व श्रीमती अनुराधा लोंढे विशेष परिश्रम घेतले.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय