केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करताना मातंग समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते |
पिंपरी चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी पिंपरी – चिंचवड मातंग समाजाच्या वतीने साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरूषाच्या यादीत नाकारल्यामुळे केंंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला.
या विरोधात संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने व निदर्शने चालू आहेत. मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संदीपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी संदीपान झोंबाडे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सामाजिक न्यायमंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे काम चालते. त्याचा संचालक म्हणून विकास त्रिवेदी काम करतात. त्याचे म्हणणे असे आहे की अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत म्हणून नाव समाविष्ट केले नाही. अण्णा भाऊ साठे विज्ञानवादी, प्रयत्नवादी, वास्तववादी विचाराचे लोकशाहीर, कामगार नेता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेतृत्व होते.
… म्हणून या मनूवादी संचालकांने अण्णाभाऊ साठे यांचे नाव नाकारले – संदीपान झोंबाडे
अण्णा भाऊनी असे लिहून ठेवले आहे की, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कमगाराच्या श्रमिकाच्या तळहातावर तरली आहे. म्हणून या मनूवादी संचालकाने अण्णाभाऊ यांचे नाव नाकारले असावे. म्हणून या संचालकाचा व सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करीत आहोत. या मंत्रालयाने तत्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीत सामाविष्ठ करावे ही मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात असल्याचेही झोंबाडे म्हणाले.
या आंदोलनामध्ये भगवान शिंदे, प्रल्हाद कांबळे,नाना कसबे, संजय ससाणे, गणेश आडागळे, राजू आवळे, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, विशाल कसबे, अण्णा कसबे, गणेश साठे, दादाभाऊ आल्हाटसर, आबा भवाळ, हनुमंत वाघमारे, सतीश कांबळे, नितीन घोलप, मीनाताई कांबळे, मालनताई गायकवाड, नंदाताई कांबळे, मारूती दाखले, अक्षय दुनघव, आकाश शिंदे, प्रा.बी.बी.शिंदे, दुराजी शिंदे, उमेश हानवते, सतीश भवाळ, विट्ठल शिंदे, कल्पना कांबळे, चांदणी सरवदे, वैशाली कांबळे, अंजना जगताप, छबुताई कांबळे, दशरथ कांबळे, कैलास कसबे, इ. अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
– क्रांतिकुमार कडुलकर