Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : सिंधुताई वात्सल्याचा, ममतेचा आदर्श : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव

पिंपरी चिंचवड : सिंधुताई वात्सल्याचा, ममतेचा आदर्श : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव

फ – क्षेत्रीय कार्यालयात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

पिंपरी : ज्यांना समाजाने अव्हेरले, झिडकारले त्या अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मश्री सिंधूताई सपकाळ या थोर समाजसुधारक होत्या.  हजारो अनाथ मुलामुलींचा सांभाळ करुन त्यांनी आदर्श वात्सल्याचा, ममतेचा आदर्श निर्माण केला, अशा शब्दांत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी सिंधूताईं सपकाळ यांना श्रध्दांजली वाहिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दिनेश यादव बोलत होते.

यावेळी प्रभाग अध्यक्ष कुदंन गायकवाड, क्रीडा समिती सभापती नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, स्विनल मेत्रे , साधना मळेकर, संतोष मोरे, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे आदी उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय